महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SRH vs LSG : दुसरा विजय! हैदराबादवर लखनऊची 12 धावांनी मात; आवेशने सामना फिरवला - हैदराबादवर विरूद्ध लखनऊची मॅच

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 7 गडी गमावून 169 धावा केल्या. (Second consecutive win for Lucknow) प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ नऊ विकेट्सवर केवळ 157 धावाच करू शकला. हा लखनौचा सलग दुसरा विजय आहे.

हैदराबादवर लखनऊची 12 धावांनी मात
हैदराबादवर लखनऊची 12 धावांनी मात

By

Published : Apr 5, 2022, 7:14 AM IST

Updated : Apr 5, 2022, 7:23 AM IST

दिल्ली - लखनऊ सुपरजायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत 7 गडी गमावून 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 157 धावा करता आल्या. या विजयासाठी लखनऊच्या गोलंदाजांनी मोठी मेहनत घेतली. (SRH vs LSG IPL 2022) आवेश खानने तब्बल ४ बळी घेत हैदराबाद संघाला खिळखिळे केले. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने 18व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले.

शेवटी पराभवाला सामोरे जावे लागले - हैदराबादला 18 चेंडूत 33 धावांची गरज होती. त्यावेळी निकोलस पूरन आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर होते. (Hyderabad vs Lucknow 2022) या षटकात आवेशने निकोलस पूरन (34) आणि अब्दुल समद (0) यांना सलग दोन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आवेशने या षटकात सात धावाही दिल्या. यानंतर हैदराबाद संघाला सावरता आले नाही. शेवटी पराभवाला सामोरे जावे लागले.

अब्दुल समदला क्विंटन डी कॉकने झेलबाद केले - आवेशने सामन्याचे समीकरणच बदलून टाकले. आवेश खानने 18व्या षटकात शानदार गोलंदाजी केली. त्याने लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आवेशने निकोलस पूरनला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. त्याला 24 चेंडूत 34 धावा करता आल्या. त्याचवेळी पुढच्याच चेंडूवर चार कोटी रुपयांना रिटेन केलेल्या अब्दुल समदला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने झेलबाद केले. समदचा आयपीएलमध्ये खराब फॉर्म कायम आहे.

गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे 10व्या क्रमांकावर - लखनऊ संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या संघाने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरातविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर लखनऊने पुनरागमन करत चेन्नई आणि हैदराबादविरुद्ध विजय मिळवला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर हैदराबादचा सलग दुसऱ्या सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. SRH चा संघ गुणतालिकेत शेवटच्या म्हणजे 10व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा -आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट इलेव्हन टीम; एकाही भारतीय खेळाडूला मिळाले नाही स्थान

Last Updated : Apr 5, 2022, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details