कोलकाता: आयपीएल सामन्यात हॅरी ब्रूकने धमाकेदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये हैदराबाद सनरायझर्स संघासाठी हॅरी ब्रूकने 55 चेंडूत 100 धावांची खेळी करून क्षमता सिद्ध केली आहे या खेळीदरम्यान हॅरी ब्रूकने 12 चौकार आणि 3 षटकार मारून गोलदाजांची धुलाई केली आहे. त्याचबरोबर पहिल्या विकेटपासून सहाव्या विकेटपर्यंत प्रत्येक खेळाडूसोबत छोट्या-मोठ्या भागीदारी करत संघासाठी मोठे योगदान केले आहे. हॅरी ब्रूकने मयंक अग्रवालसोबत पहिल्या विकेटसाठी 25 चेंडूत 46 धावा, तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार एडन मार्करामसह 47 चेंडूत 72 धावा आणि अभिषेक शर्मासोबत 33 चेंडूत 72 धावा करत सनरायझर्स हैदराबादचा २०० टप्पा ओलांडला.
सर्व आयपीएल सीझनमध्ये पहिले शतक कोणी झळकावले आहे. हॅरी ब्रूक्सने या आयपीएल हंगामातील पहिले शतक झळकावताच आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कोणत्या खेळाडूंनी पहिले शतक झळकावले आणि त्यात किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल 2008 पासून सुरू झालेल्या आयपीएल सीझनपासून आतापर्यंतच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर आयपीएलच्या एकूण 16 सीझनपैकी विदेशी खेळाडूंनी 9 सीझनमध्ये शतक झळकावले आहे. तर भारतीय खेळाडूंनी केवळ 7 सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन पहिल्या क्रमांकावर आहे.