नवी दिल्ली :गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे अभिनंदन केले आहे. पण त्याचे गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत नेण्याचे स्वप्नही त्याने कायम ठेवले आहे. हार्दिकने धोनीशी हस्तांदोलन केले आणि फायनलमध्ये सीएसके विरुद्ध गुजरातच्या सामन्याचे संकेतही दिले. हार्दिक आयपीएलचे विजेतेपद पुन्हा मिळवण्यासाठी सर्व तयारी करत आहे. यासोबतच क्वालिफायर 1 मध्ये त्याने केलेली चूक सुधारण्यासाठीही तो आग्रही आहे.
चेन्नई दहाव्यांदा पोहचली आयपीएलच्या अंतिम फेरीत :मंगळवारी सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी केली. त्याने 44 चेंडूत 60 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. सामन्याच्या शेवटी अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनीही साथ दिली. यासह सीएसकेला 7 विकेट्सवर 172 धावा करता आल्या. 173 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गुजरात टायटन्ससाठी कोणत्याही खेळाडूला महत्त्वाची भागीदारी करता आली नाही. सीएसकेच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सवर कहर केला. रवींद्र जडेजाने 18 धावांत 2 बळी घेतले. त्याचवेळी महेश तिक्षाने 28 आणि दीपकने 29 धावा खर्च करून 2-2 बळी घेतले. सीएसकेच्या फिरकीपटूंनी गुजरातला 157 धावांपर्यंत रोखले आणि चेन्नईला दहाव्यांदाआयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवले.
पंड्याने केले धोनीचे अभिनंदन : हार्दिकने विजयाबद्दल धोनीचे अभिनंदन केले आणि सांगितले की सीएसके कर्णधार आपल्या गोलंदाजांचा चांगला वापर करून घेतो. धोनीची हीच खासियत आहे की, त्याच्या मनाने आणि ज्या पद्धतीने तो गोलंदाजांचा वापर करतो, त्यावरून तो 10 धावांची भर घालतोय. आम्ही विकेट्स गमावत राहिलो, ते गोलंदाज बदलत राहिले. पण आम्ही दोन दिवसांनी पुन्हा चांगली कामगिरी करू.