लंडन:भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील आज तिसरा सामना खेळला ( IND vs ENG 3rd ODI ) जात आहे. ओल्ड ट्रॅफर्डवरील सामन्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ब्रेक घेणार ( Virat Kohli take break from cricket ) आहे. त्यानंतर विराट कोहली 27 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या आशिया कपच्या तयारीसाठी भारतीय संघात पुनरागमन करेल. असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की कोहली त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवेल, ज्यामध्ये त्याची आई देखील आहे. त्याला काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा आहे, असे सांगण्यात आले.
त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Actress Anushka Sharma ) आणि मुलगी आधीच लंडनमध्ये आहेत, कोहलीच्या कुटुंबातील आणखी काही सदस्य सर्व-फॉर्मेट मालिकेच्या समाप्तीनंतर त्याच्यासोबत सामील होतील. भारताच्या माजी कर्णधाराला 22 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या आठ सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) साठी भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.