नवी दिल्ली : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. राजस्थान रॉयल्स 2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएलचा चॅम्पियन आहे. तेव्हा शेन वॉर्न राजस्थानचा कर्णधार होता. राजस्थानने गेल्या मोसमात अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्कारावा लागला होता. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद एक वेळचा चॅम्पियन आहे. त्यांनी 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली होती.
हेड टू हेड : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या गेल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल्सचे वर्चस्व राहिले आहे. रॉयल्सने तीन सामने जिंकले आहेत तर हैदराबादला दोन सामने जिंकता आले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सनरायझर्सचा कर्णधार आहे. धडाकेबाज सलामीवीर मयंक अग्रवाल देखील या संघात आहे, जो मागील हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार होता. तसेच राहुल त्रिपाठी आणि हॅरी ब्रूकसारखे फलंदाज हैदराबादला स्वबळावर सामने जिंकून देऊ शकतात.