महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सकडून पंजाब किंग्जला धोबीपछाड, केकेआर गुणतालिकेत पोहोचला पाचव्या क्रमांकावर

कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जला 5 विकटने पराभूत केले आहे.

Kolkata Knight Riders vs Punjab Kings
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज

By

Published : May 8, 2023, 7:45 PM IST

Updated : May 9, 2023, 6:33 AM IST

कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जला पराभवाची धूळ चारली आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात नितीश राणाच्या टीम केकेआरने पंजाब किंग्जचा 5 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या संघाने 20 षटकांत 7 बाद 179 धावा केल्या. केकेआरने 20 षटकांत 5 गडी गमावून 182 धावा करत आपले लक्ष्य अगदी सहज गाठले. केकेआर 5व्या विजयासह 10 गुणांसह गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज 11 सामन्यांत 10 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात पंजाब किंग्जमध्ये एक बदल करण्यात आला. मॅथ्यू शॉर्टच्या जागी भानुका राजपक्षेला प्लेइंग-11 मध्ये ठेवण्यात आले होते.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग 11) : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती ; इम्पॅक्ट प्लेअर्स -जेसन रॉय, अनुकुल रॉय, एन. जगदीशन, लॉकी फर्ग्युसन, कुलवंत खेजरोलिया

पंजाब किंग्ज (प्लेइंग 11) : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग ; इम्पॅक्ट प्लेअर्स - नॅथन एलिस, सिकंदर रझा, अथर्व तायडे, मोहित राठी, मॅथ्यू शॉर्ट

शिखर धवन : आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. विकेट खूप कोरडी दिसते आहे. आम्हाला मोठी धावसंख्या उभारून त्याचा बचाव करायला आवडेल. आम्ही प्रत्येक सामन्यात 200 धावा करत आहोत ही चांगली गोष्ट आहे. संघात एक बदल आहे. शॉर्टच्या जागी भानुका येतो आहे.

हे ही वाचा :

  1. IPL 2023 : कोहली आणि गंभीर यांच्यात 10 वर्षांनंतर पुन्हा शाब्दिक भांडण, नेमके काय घडले वाचा?
  2. Mohammed Siraj Phil Salt Controversy : आधी सिराज - सॉल्ट यांच्यात झाली बाचाबाची, नंतर मिठी मारून केले एकमेकांचे अभिनंदन
  3. Robin Uthappa praised Yashasvi Jaiswal : शानदार शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल भारतीय क्रिकेटच्या पुढील सुपरस्टारपैकी एक - रॉबिन उथप्पा
Last Updated : May 9, 2023, 6:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details