महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : गुजरातचा कोलकातावर 7 गडी राखून शानदार विजय, विजय शंकरचे नाबाद अर्धशतक

गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाताने दिलेले 180 धावांचे लक्ष गुजरातने 17.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. गुजरातकडून विजय शंकरने 24 चेंडूत सर्वाधिक 51 धावांची नाबाद खेळी केली.

Gujrat Titans vs Kolkata Knight Riders
गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

By

Published : Apr 29, 2023, 3:29 PM IST

Updated : Apr 29, 2023, 8:00 PM IST

कोलकाता : आयपीएल 2023 मध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. हा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला आहे.

विजय शंकरचे नाबाद अर्धशतक : गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने गुजरातसमोर विजयासाठी 180 धावांचे लक्ष ठेवले. गुजरातने हे लक्ष 17.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. गुजरातकडून विजय शंकरने 24 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. तर कोलकाताकडून नरेन, रसेल आणि हर्षित राणाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) :वृद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल ; इम्पॅक्ट खेळाडू - शुभमन गिल, श्रीकर भरत, आर. साई किशोर, शिवम मावी, जयंत यादव.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : एन. जगदीशन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती ; इम्पॅक्ट खेळाडू -सुयश शर्मा, मनदीप सिंग, अनुकुल रॉय, टिम साउदी, कुलवंत खेजरोलिया.

हार्दिक पंड्या : हवामानामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्ही येथ आलो तेव्हा वातावरण उजळ होते आणि आम्हाला वाटले की आपण फलंदाजी करावी, परंतु आता चित्र बदलले आहे. आम्ही जिथे आहोत त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. 7 सामने झाले आहेत, आणखी 7 बाकी आहेत. आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे आणि प्लेऑफसाठी पात्र होणे आवश्यक आहे. आम्ही पराभवातूनही शिकू, पण आम्हाला फक्त सातत्यपूर्ण क्रिकेट खेळण्याची गरज आहे. आम्ही तोच संघ खेळवत आहोत.

नितीश राणा : आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती. ढगाळी वातावरणामुळे डकवर्थ लुईस नियम समीकरणात येऊ शकतो, परंतु तरीही आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे आम्ही सुधारणा करू शकतो. आमच्या संघात काही सक्तीचे बदल झाले आहेत - जेसन रॉयला पाठीचा त्रास आहे, त्याची जागा गुरबाजने घेतली आहे. उमेश यादवच्या जागी हर्षित राणा संघात आला आहे.

हेही वाचा :IPL 2023 : संजू सॅमसनने संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफचे केले कौतुक

Last Updated : Apr 29, 2023, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details