महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय

आयपीएल 2023 चा 61 वा सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 6 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 18.3 षटकांत 4 गडी गमावून 147 धावा केल्या. आणि कोलकाताने 6 विकेट्सने विजय मिळवला.

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

By

Published : May 14, 2023, 7:36 PM IST

Updated : May 14, 2023, 11:44 PM IST

चेन्नई : आयपीएल 2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 144-6 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 34 चेंडूत सर्वाधिक 48 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

चेन्नई सुपर किंग्ज स्कोअर: नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकात 6 गडी गमावून फक्त 44 धावा केल्या. CSK कडून शिवम दुबेने सर्वाधिक 48 धावा करून नाबाद राहिला. यासोबतच डेव्हन कॉनवेनेही ३० धावांची खेळी केली. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. केकेआरचे स्टार फिरकीपटू सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

सीएसकेला सहावा धक्का: केकेआरचा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याने 20व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 20 धावांवर वरुण चक्रवर्तीकरवी रवींद्र जडेजाला झेलबाद केले. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. चेन्नई सुपर किंग्जचे डावखुरे फलंदाज शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्यातील अर्धशतकी भागीदारी 43 चेंडूत पूर्ण झाली.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर्स -मथीशा पाथीराना, निशांत सिंधू, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग 11) : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती ; इम्पॅक्ट प्लेअर्स -व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, एन जगदीसन, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन.

महेंद्रसिंह धोनी : आम्ही विकेटबाबत थोडेसे अनिश्चित आहोत. स्पर्धा जसजशी पुढे जात आहे तसतशी खेळपट्टी संथ होत जाते. गेली अनेक वर्षे आम्ही सलामीवीरांना खेळपट्टीचे त्वरीत मूल्यांकन करण्यास आणि त्यावर किती धावसंख्या पुरेशी असेल हे शोधण्यास सांगितले आहे. 6 - 8 षटकांनंतर आम्हाला आमच्या धावसंख्येकडे पुन्हा एकदा नजर टाकावी लागते कारण तोपर्यंत चेंडूने त्याची चमक गमावलेली असते. मला वाटते की आम्ही खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. परंतु क्षेत्ररक्षण हा एक विभाग आहे जिथे आम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या मॅचसाठी मागील सामन्याचा संघच कायम आहे असे धोनी ने सुरवातीलाच सांगितले होते.

नितीश राणा : आम्हालाही प्रथम फलंदाजी करायला आवडले असते. प्रथम फलंदाजी करून नंतर आम्ही आमच्या फिरकीपटूंना मॅचमध्ये आणले असते. माझ्या मते पहिल्या सामन्यातही आमच्यावर दबाव होता, आणि आताही आहे. हे आयपीएल आहे. तुम्ही त्याला हलक्यात घेऊ शकत नाही. कोणताही डाव चुकला तर 90 टक्के निकाल तुमच्या विरोधात जातो. म्हणून आपण सर्व विभागांमध्ये क्लिनिकल असणे आवश्यक आहे. आमच्या संघात एक बदल आहे - अनुकुल रॉय बाहेर जातो आहे. त्याच्याजागी वैभव अरोरा येतो आहे. असे राणाने स्पष्ट केले होते.

केकेआरसाठी महत्वाचे : चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याचे ध्येय या सामन्याच्या माध्यमातुन ठेवतील. हा सामना होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे सध्या 12 सामन्यांतून 15 गुण आहेत आणि ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत. दुसरीकडे, केकेआरकडे फक्त 10 गुण आहेत आणि त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील यातील एक सामना आज जिंकला आहे.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : आरसीबीकडून राजस्थानचा दारूण पराभव, अवघ्या 59 धावांवर संघ ऑलआऊट
  2. Sachin Tendulkar : वैद्यकीय उत्पादनाच्या जाहिरातीत अवैधपणे वापरले सचिन तेंडुलकरचे नाव, गुन्हा दाखल
  3. Virat Kohli Instagram Post : राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केला 'हा' फोटो शेअर, म्हणाला..
Last Updated : May 14, 2023, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details