पुणे:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ( IPL 2022 ) चौदावा सामना आज पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात साडेसात वाजता सुरु होईल. तत्पुर्वी या दोन्ही संघात नाणेफेक झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Kolkata Knight Riders opt to bowl ) आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला आमंत्रित केले आहे.
आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होत असलेल्या सामन्यात दोन मुंबईकर खेळाडू कर्णधार म्हणून आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता संघाचा नेतृत्व करताना श्रेयस अय्यर ( Captain Shreyas Iyer ) करत आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व नेहमीप्रमाणे रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) करत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आतापर्यंत आयपीएल इतिहासात 29 सामने झाले आहेत. त्यापैकी 22 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर सात सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. अनमोलप्रीत सिंगच्या जागी सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघात देखील एक बदल करण्यात आला आहे. ज्यामध्ये पॅट कमिन्सला ( Pat Cummins ) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे.