नवी दिल्ली -आयपीएलचा 27 वा सामना काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने ४ गडी राखून चेन्नई संघावर विजय मिळवला आहे. हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्यात टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईला विजयासाठी चेन्नईने 229 धावांचे तगडे आव्हान दिले होते.
मुंबईचा डाव
चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. त्यानंतर मुंबईनेही फलंदाजीला दणक्यात सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडीने 71 धावांची खेळी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने रोहित शर्माला 35 धावांवर ऋतुराज गायकवाडच्या हाती कॅच आऊट केले. तर रविंद्र जडेजाने सुर्यकुमार यादवला 3 धावांवर एम एस धोनीच्या हाती कॅच ऑऊट केले आहे. फटकेबाजी करणाऱ्या डी कॉकला मोईन अलीने बाद केले आहे. सध्या मैदानात कायरन पोलार्ड 3 धाव, तर कृणाल पांड्या 14 धावांवर खेळत आहे.
- मुंबई इंडियन्सने 12 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 94 धावा पूर्ण केल्या आहेत.
चेन्नईचा डाव
चेन्नईला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. ऋतुराज गायकवाड कॅच आऊट झाला. मात्र, फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली यांनी चांगलीच धावांची बरसात केली आहे. फाफ डु प्लेसिसने 50 धावा तर मोईल अलीने 58 धावांची खेळी केली आहे. मोईल अलीला जसप्रीत बुमराहने विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती कॅच आऊट केले. मोईनने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तर डु प्लेसिसला कायरन पोलार्डडने जसप्रीत बुमराहच्या हाती कॅच आऊट केले. पुढच्या चेंडूवर सुरेश रैनाला 2 धावांवर कॅच आऊट केले.