मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये, मुंबई इंडियन्स संघाने आपली गोलंदाजी मजबूत करण्यासाठी जखमी खेळाडू जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डनचा आपल्या संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल 2023 मधून बाहेर पडला. दोन कोटी खर्चून मुंबई इंडियन्सने ख्रिसला संघाचा भाग बनवले आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
IPL 2023 : जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डनचा मुंबई इंडियन्स संघात समावेश - chris Jordan
जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डन आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे. दोन कोटी खर्चून मुंबई इंडियन्सने ख्रिसला संघाचा भाग बनवले आहे.
मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी मजबूत होईल : जोफ्रा आर्चर शस्त्रक्रियेनंतर आपल्या देशात परत आल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स संघाने एक निवेदन जारी करून ख्रिस जॉर्डनला दोन कोटी रुपये खर्चून मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. पुढील सामन्यांसाठी तो लवकरच मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी मजबूत होईल. मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या गोलंदाजीमुळे सतत अडचणीत असतो. अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाचा भाग बनू शकले नाहीत.
जॉर्डनचा 2016 च्या आयपीएलमध्ये डेब्यू : मुंबई इंडियन्सने सांगितले की, ख्रिस जॉर्डनने 2016 च्या आयपीएलमध्ये डेब्यू सामना खेळला होता. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 28 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 27 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर जोफ्रा आर्चरचा टी-20 मध्येही चांगला रेकॉर्ड आहे. ख्रिस जॉर्डनने आतापर्यंत इंग्लंड संघासाठी एकूण 87 टी-20 सामने खेळले असून त्याने आतापर्यंत 96 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डन आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे.
- हेही वाचा : IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सकडून पंजाब किंग्जला धोबीपछाड, केकेआर गुणतालिकेत पोहोचला पाचव्या क्रमांकावर
- हेही वाचा : Asian Weightlifting Championship 2023 : 20 वर्षीय जेरेमीचा पराक्रम, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्यपदक!
- हेही वाचा : Mohammed Siraj Phil Salt Controversy : आधी सिराज - सॉल्ट यांच्यात झाली बाचाबाची, नंतर मिठी मारून केले एकमेकांचे अभिनंदन