महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : आयपीएल उद्घाटन सोहळ्यात जादुई आवाजाच्या अरिजित सिंगने धोनीच्या पायांना केला स्पर्श; सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव - जादुई आवाजाचा अरजिंत सिंहने पायांना स्पर्श

तमन्ना भाटिया, रश्मिका मानधना आणि गायक अरिजित सिंग यांनी आयपीएल 2023 च्या उद्घाटन सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. जादुई आवाजाने तरुणींना मोहिनी घालणाऱ्या अरिजित सिंगने आपल्या गाण्यांनी लोकांमध्ये नवचैतन्य फुलवले. त्याच्या गाण्यावर तरुणाई चांगलीच थिरकताना दिसत होती. उद्घाटनावेळी त्याने महेंद्रसिंग धोनीची भेट घेताना पायांना स्पर्श करताना त्याचा नम्रपणा भाव खाऊन गेला.

Arijit Singh Touches Feet Of MS Dhoni During IPL 2023 Opening Ceremony
आयपीएल उद्घाटन सोहळ्यात जादुई आवाजाचा अरजिंत सिंहने धोनीच्या पायांना केला स्पर्श

By

Published : Apr 1, 2023, 4:38 PM IST

नवी दिल्ली : शुक्रवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभात बॉलिवूडची जादू चालली. हॉट आणि गॉर्जियस तमन्ना भाटिया आणि रश्मिका मानधना यांनी आपल्या डान्स मूव्हने प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. रश्मिकाने ऑस्कर पुरस्कार विजेत्या 'नाटू-नाटू' गाण्यावर जोरदार डान्स केला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. या सोहळ्यादरम्यान एक क्षण आला जेव्हा अरिजित सिंग भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पायांना स्पर्श करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अरिजितचे सोशल मीडियावर खूप कौतुक :अरिजित सिंगचा धोनीच्या पायाला स्पर्श करतानाचा फोटो सोशल मीडियावर लाइक केला जात आहे. हा फोटो पाहून लोक अरिजितचे खूप कौतुक करत आहेत. अरिजित पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताच धोनीने त्याचे हात धरले. अरिजित सिंगचे जगभरात करोडो चाहते आहेत. आतापर्यंत लोक त्याच्या गाण्यांचे आणि साधेपणाचे चाहते होते. पण त्याने धोनीबद्दल दाखवलेला आदर आपल्या लोकांना पटला. माही टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक जिंकला.

गुजरात टायटन्सने मारली बाजी :IPL च्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे संघ भिडले. टायटन्सने चार चेंडू शिल्लक असताना पाच गडी राखून सामना जिंकला. CSK ने 20 षटकात 7 गडी गमावून 178 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा फटकावल्या. गायकवाडने या डावात चार चौकार आणि नऊ षटकार मारले. जीटीने सीएसकेचे १७८ धावांचे लक्ष्य १९.२ षटकांत पूर्ण केले. राहुल तेवतियाने 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला.

या दिग्गज कलाकारांनी दाखवली झलक :या आयपीएल हंगामाला सुरुवात झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक अरजित सिंहने या कार्यक्रमाची शोभा वाढवत, आयपीएलसाठी गाणी गायली. तसेच, हिंदी चित्रपटसृष्टीची नायिका तमन्ना भाटियाने या कार्यक्रमात सुंदर डान्स करून मोठा तडका टाकला.

रश्मिका मंधानाचा जबरदस्त परफाॅर्मन्स :त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री मंधाना हिने तिच्या पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर सुंदर परफाॅर्मन्स करीत शानदार डान्स केला. नरेंद्र मोदी स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. त्याचबरोबर रश्मिका मंधाना हिने जबरदस्त डान्स प्रेक्षकांना तिच्या गाण्यावर थिरकायला लावले.

हेही वाचा : IPL 2023 : केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; पंजाब किंग्जच्या 2 षटकांत 23 धावांवर 1 विकेट

ABOUT THE AUTHOR

...view details