मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) सायकल 2023-27 साठी मीडिया हक्कांचा लिलाव रविवारी सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालला. दरम्यान, स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे हक्काचे मूल्य 100 कोटींच्या पुढे गेले आहे. आता सोमवारी सकाळी 11 वाजता ई-लिलाव सुरू होणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या प्रत्येक सामन्याची किंमत 100 कोटींच्या पुढे गेली आहे.
कोणत्या कंपनीने किती बोली लावली हे अद्याप कळलेले नाही. मात्र, टीव्हीच्या हक्कांसाठी डिस्ने स्टार, सोनी नेटवर्क आणि रिलायन्स यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्याच वेळी, झी, हॉटस्टार आणि रिलायन्स जिओ डिजिटल अधिकारांच्या शर्यतीत ( The race for digital rights ) आहेत. एम-जंक्शनने आयपीएल मीडिया ई-लिलावची ( IPL media e-auction ) जबाबदारी घेतली आहे.
अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की डिजिटल अधिकारांची किंमत टेलिव्हिजन अधिकारांच्या ( IPL television rights ) अगदी जवळ असण्याची शक्यता आहे. टीव्हीसाठी प्रत्येक सामन्याची आधारभूत किंमत 49 कोटी रुपये आणि डिजिटलसाठी 33 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत डिजिटलसाठी 46 कोटी रुपये आणि टीव्हीसाठी 54.5 कोटी रुपयांची बोली लागली आहे.