नवी मुंबई: आयपीएल 2022 च्या मोसमातील 31 वा सामना नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (19 एप्रिल) संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. हा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( LSG vs RCB ) संघात होणार आहे. हे दोन्ही संघ प्रथम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार केएल राहुल ( KL Rahul ) आणि फाफ डु प्लेसिस ( Faf du Plessis ) यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Lucknow Super Giants opt to bowl ) आहे.
लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants ) आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. या संघाला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे हा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाने देखील सहा सामने खेळलेत, ज्यापैकी चार सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे या संघाचे आठ गुण आहेच आणि हा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघानी आजच्या सामन्यासाठी आपापल्या संघात एक ही बदल केलेला नाही. दोन्ही संंघांनी मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे.