मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2022 ) चा 15 वा हंगाम सुरू आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) आणि पंजाब किंग्ज ( Punjab Kings ) यांच्यात हंगामातील 38 व्या सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एका वेगळ्या गोष्टीची चर्चा पाहायला मिळाली. हिमाचल प्रदेशातून येणारा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ऋषी धवन ( All-rounder Rishi Dhavan ) फेस प्रोटेक्शन मास्क ( Face Protection mask ) परिधान करून आला होता. अशा स्थितीत त्याला पाहताच सर्व चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की, ते चष्म्यासारखे आणि थोडेसे कोरोना शील्डसारखे दिसणारे नक्की काय आहे. अखेर असे काय आहे की आयपीएलमध्ये 6 वर्षांनंतर मैदानात उतरलेला ऋषी धवन तो परिधान करून मैदानात उतरला आहे.
या दोन कारणांमुळे ऋषींनी प्रोटेक्शन मास्क घातला -वास्तविक, ऋषी धवनने चेहऱ्यावर फेस प्रोटेक्शन ( Face Protection ) मास्क घातला होता. कारण भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर खूप वेगाने चेंडू लागला होता. त्यामुळे ऋषीला नाकाला दुखापत झाली होती. अशाप्रकारे, भविष्यात अशाच प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी हे संरक्षण मास्क घातले होते. त्यामुळे फलंदाजांना चेंडू पाहण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि ते नियमांच्या विरोधात नाही.
आणखी एक कारण असेही समोर आले आहे की, जेव्हा तो गोलंदाजी करतो तेव्हा चेंडू फेकल्यानंतर तो फलंदाजाच्या दिशेने धावतो. त्यामुळे दुखापतीचा धोका वाढतो. या दोन कारणांमुळे जेव्हा ऋषी चेन्नईविरुद्धच्या आयपीएल मैदानात 6 वर्षांनी उतरतो तेव्हा त्याने चष्मासारखा संरक्षक मुखवटा घातला होता. 21 मे 2016 रोजी धवनने आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता.