मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022 ) च्या 12 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) संघात सामना खेळला जात आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.
सनरायझर्स हैदराबादचा ( Sunrisers Hyderabad ) कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौ सुपरजायंट्सच्या संघात दुष्मंथा चमीराच्या जागी जेसन होल्डरचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, लखनौची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये तीन गडी बाद झाले आणि 6 षटकांनंतर 32/3 धावसंख्या होती. क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस 1-1 आणि मनीष पांडेने 11 धावा केल्या.