अहमदाबाद:इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम आता रोमांचक टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील फक्त तीन दोन सामने बाकी आहे. त्यानंतर आयपीएल 2022 च्या विजेत्याचे नाव जाहीर होईल. या अगोदर क्वालिफायरचा दुसरा आणि फायनल सामना खेळला जाणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Qualifier 2 RCB vs RR ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्या अगोदर माजी खेळाडू रवी शास्त्री आणि ग्रॅमी स्मिथ आपली मते मांडली आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स ( RCB vs RR ) यांच्यात शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकेल, असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. कारण दोन्ही संघांना रविवारी गुजरात टायटन्सशी सामना करुन विजेतेपद पटकावयचे आहे. परंतु दोन्ही संघांपैकी फक्त एका संघाला गुजरातबरोबर मुकाबला करण्याची संधी मिळेल.
स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्ह शोमध्ये शास्त्री ( Former player Ravi Shastri ) म्हणाले, आरसीबीला 14 वर्षे झाली आहेत. त्यांनी आयपीएलचा एक ही किताब पटकावला नाही, तसे 13 वर्षांपूर्वी राजस्थानने त्यांचे शेवटचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे दोघांमध्ये काट्याची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी वाट पाहू. ही स्पर्धा खूप मोठी होणार आहे कारण दोन्ही संघांना ती शानदार ट्रॉफी जिंकायची आहे.