नवी मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील ( Indian Premier League 15th Season ) 58 वा सामना बुधवारी (11 मे)डी. व्हाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या हंगामातील या दोन संघातील दुसरा सामना आहे. पहिला सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी धूळ चारली होती. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने कॅपिटल्स ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे या संघाचे चौदा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील तितकेच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाच विजयासह सहा पराभव स्वीकारले आहेत. म्हणून या संघाचे 10 गुण आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने ( Spinner Kuldeep Yadav ) विकेट घेतल्या आहेत, मात्र गेल्या दोन सामन्यांत तो चांगलाच महागात पडला आहे. वेगवान गोलंदाज एनरिच नोर्कियाच्या पुनरागमनाने फारसा फरक पडला नाही. कारण तो मागील हंगामातील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. खलील अहमद निश्चितच किफायतशीर होता आणि अक्षर पटेलने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नरच्या ( Batsman David Warner ) बॅटला धावा मिळाल्या मात्र त्याला सलामीच्या जोडीदारांची मदत मिळाली नाही. दिल्लीने पृथ्वी शॉपासून मनदीप सिंग आणि श्रीकर भारतपर्यंत प्रयत्न केले पण वॉर्नरसाठी योग्य सलामीचा जोडीदार सापडला नाही.