मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ( Indian star batsman Virat Kohli ) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या मोसमात कोहली शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ होती. कोहलीच्या खराब फॉर्मनंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी त्याला क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर आता माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर ( Former veteran Sunil Gavaskar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया ( Sunil Gavaskar Reaction ) देताना आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते कोहलीने कोणत्याही परिस्थितीत मैदान सोडू नये. माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर कॉमेंट्री करताना म्हणाले. जोपर्यंत ब्रेक्सचा संबंध आहे, कोहली भारताचे सामने गमावत नाही. भारताचे सामने हे पहिले प्राधान्य असायला हवे. माझ्या मते, तुम्ही खेळला नाही, तर तुझा फॉर्म कसा परत येणार आहे. चेंज रूममध्ये बसून तुमचा फॉर्म परत मिळणार नाही. तुम्ही जितके जास्त क्रिकेट खेळता तितके तुम्हाला फॉर्ममध्ये येण्याची शक्यता जास्त असते.