मुंबई:गुरुवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 67 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघात होणार आहे, म्हणजेच गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली. नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही संघातील यंदाच्या हंगामातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्याच गुजरात टायटन्सने आरसीबीवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ( Royal Challengers Bangalore Team ) आतापर्यंत तेरा सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय मिळवण्यात संघाला यश मिळाले आहे. त्याचबरोबर या संघाला सहा सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे संघाचे 14 गुण असून संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तसेच संघ अजून प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे या संघाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन):विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल आणि जोश हेझलवूड.