कोलकाता: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामातील एलिमिनेटर सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Eliminator RCB vs LSG ) संघात खेळला. हा सामना आरसीबी संघाने लखनौ संघावर 14 धावांनी मात ( RCB beat LSG by 14 runs ) केली. त्यामुळे लखनौचा संघ आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर पडला. लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) मेंटॉर गौतम गंभीरने चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहे.
एलएसजीचा मेंटॉर गौतम गंभीर ( LSG Mentor Gautam Gambhir ) म्हणाला, इंडियन प्रीमियर लीग 2022 ( IPL2022 ) मधील त्यांच्या पहिल्या मोहिमेतील एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाल्यानंतर, संघ पुढील हंगामात जोरदार पुनरागमन करेल.
आयपीएल पंधराव्या हंगामात पहिल्यांदा खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्सने ( Lucknow Super Giants ) आयपीएल 2022 मध्ये अतिशय चांगली कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आणि बुधवारी रात्री झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून संघाला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. गौतम गंभीरने लखनौ संघाला मार्गदर्शन करताना, त्यांच्याकडून चांगली कामगिरी करुन घेतली. त्याचबरोबर आयुष बदोनी सारख्या प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेतला.
गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल हंगामात दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. गौतम गंभीरने सोशल मीडियावर टीमचे कौतुक केले. गंभीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये एलएसजी नेटचा सराव करत असताना एक फोटो पोस्ट केला होता. त्याचबरोब तो पुढे म्हणाला की, पुढच्या मोसमात आम्ही आणखी मजबूत पुनरागमन करू. 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला तेव्हा गंभीर डगआउटमध्ये निराश बसला होता.
हेही वाचा -IPL 2022 Till Now : षटकारांचा नवा विक्रम...आणि या मोसमात एकही झाली नाही सुपर ओव्हर