मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठवा सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Kolkata Knight Riders vs Punjab Kings ) संघात होणार आहे. या सामन्यांची नाणेफेक श्रेयस अय्यर आणि मयंक अग्रवाल ( Captain Mayank Agarwal ) यांच्यात झाली आहे. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघाचे आता पर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध या संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर दुसरा सामना आरसीबीबरोबर झाला, त्या सामन्यात या संघाला आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर आज होत असलेला हा सामना, त्यांचा या हंगामातील तिसरा सामना आहे. तसेच पंजाब संघाचा आतापर्यंत फक्त एक सामना झाला आहे. त्याने आपल्या पहिल्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीला पराभवाची धूळ चारली होती. आज होत असलेला हा सामना त्यांचा दुसरा सामना आहे.
आजच्या सामन्यात कगिसो रबाडा हा आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पंजाब संघाकडून पदार्पण ( Rabada's debut in Punjab team ) करत आहे. त्याला आपल्या पदार्पणाची कॅप मुख्य कोच अनिल कुंबळेच्या हस्ते मिळाली. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात कोलाकाता संघाने देखील एक बदल केला आहे. शेल्डन जॅक्सनच्या जागी शिवम मावीला संधी देण्यात आली आहे. तसेच पंजाब संघाने पुन्हा एकदा युवा खेळाडू राज बावावर विश्वास दाखवून त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.