मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील 55 वा सामना रविवारी (8 मे) डी. व्हाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Chennai Super Kings vs Delhi Capitals ) संघात पार पडणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant ) यांच्यात नाणेफेक पार पडली. दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला ( Delhi Capitals opt to bowl ) आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी 16 सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय नोंदवला आहे. त्याबरोबर उर्वरित 10 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत सध्या चेन्नई सुपर किंग्जचा संघ ( Chennai Super Kings Team ) नवव्या स्थानावर आहे. चेन्नईचे 10 सामन्यात तीन विजय आणि सात पराभव आहेत. तसेच संघाच्या खात्यात सध्या 6 गुण आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) देखील यंदाच्या हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे 10 गुण असून संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.