मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 वा सामना गुरुवारी (28 एप्रिल) वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals vs Kolkata Knight Riders ) संघात साडेसातला सुरु होईल. त्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यात नाणेफक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतने गोलंदाजीचा निर्णय घेतला ( Delhi Capitals opt to bowl ) आहे.
या हंगामतील या दोन संघांचा एकमेकांविरुद्धचा दुसरा सामना आहे. या अगोदर झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर 44 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली ( Captain Shreyas iyer ) कोलकाता बदला घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने ( Kolkata Knight Riders Team ) या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात पराभव, तर तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) सात सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात पराभव आणि तीन सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह सातव्या स्थानी आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टु हेड -
1. दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान दिल्लीने 13 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 16 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे.
2. गेल्या मोसमात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले. यादरम्यान केकेआरने दोनदा, तर डीसीने एक सामना जिंकला. त्याच वेळी, या हंगामात एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने केकेआरचा पराभव केला आहे.