मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या मोसमाचा 32 वा सामना बुधवारी (20 एप्रिल) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात होणार आहे. या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघांचे कर्णधार मयंक अग्रवाल ( Mayank Agarwal ) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant ) यांच्यात पार पडली आहे. रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला साडेसातला सुरुवात होईल.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कर्णधार मयंक अग्रवाल ( Captain Mayank Agarwal ) खेळू शकला नव्हता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. परंतु आज होणाऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केले आहे. त्याच्या गैरहजेरीत मागील सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) आतापर्यंत आयपीएल 2022 मध्ये पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ ( Punjab Kings Team ) सहा सामन्यात तीन विजय आणि तीन पराभवामुळे सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.