दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. हे निराशजनक राहिलं, आम्ही शेड्यूलच्या आधी यूएईमध्ये पोहोचलो. पण ज्या पद्धतीने कोरोना विषाणूचा प्रभाव दिसत आहे. ते पाहता परिस्थिती कठिण आहे. कधी काहीही होऊ शकतो, असे विराट कोहलीने म्हटलं आहे.
विराट कोहली बंगळुरू रॉयल्सच्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना म्हणाला की, यूएईमध्ये आम्ही चांगलं, मजबूत तसेच सुरक्षित वातावरण राखण्यात यशस्वी होऊ. हे आयपीएल शानदार होईल. हा एक रोमांचक प्रवास होऊ पाहत आहे. ही बाब बंगळुरू रॉयल्स आणि टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्वपूर्ण आहे.
दरम्यान, भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश पारमार कोरोनाबाधित आढळले. तेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना नाणेफेकीच्या काही तास आधी रद्द करण्यात आला. भारतीय संघाने हा सामना खेळण्यास नकार दिला. यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी रवाना झाले.