अबुधाबी -गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात चांगली सुरूवात करता आली नाही. त्यांना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभव पत्कारावा लागला. आज मुंबई इंडियन्ससमोर कोलकाता नाइट रायडर्स संघाचे आव्हान आहे. या सामन्यात विजय मिळवून मुंबईचा संघ विजयी मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे केकेआरच्या संघाने दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केला होता. यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे.
पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबईने 8 सामने खेळली असून यात त्यांनी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने 8 सामन्यात 3 विजय मिळवले आहेत. ते गुणतालिकेत 6 व्या स्थानी आहेत.
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स हेड टू हेड रेकॉर्ड -
उभय संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 28 वेळा आमने-सामने झाले आहेत. यातील 22 सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाला फक्त 6 सामने जिंकता आली आहे. मागील सहा हंगामात केकेआरला फक्त एका सामन्यात मुंबईवर विजय मिळवता आला आहे. मागील 12 पैकी 11 सामने मुंबईने जिंकली आहेत. ही आकडेवारी पाहता मुंबईचे पारडे जड आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ -