नवी दिल्ली - आयपीएल २०२१ मध्ये आज २३वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगला आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी अभिषेक शर्मा आणि विराट सिंह यांना वगळून त्यांच्या जागेवर मनीष पांडे आणि संदीप शर्मा यांना संधी दिली आहे. तर चेन्नईने देखील आपल्या संघात दोन बदल केले आहेत. इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्होला बाहेर करत मोईन अली आणि लुंगी एनगिडी यांना अंतिम संघात स्थान दिलं आहे.
चेन्नई वि. हैदराबाद हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत १४ सामने झाली आहेत. यातील १० सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. तर अवघ्या चार सामन्यात हैदराबादचा संघ विजयी ठरला आहे. हेड टू हेड आकडेवारी पहिल्यास चेन्नईचा पगडा भारी वाटत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ -