मुंबई - सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा ९ गडी राखून पराभव करत चौदाव्या हंगामातील पहिला विजय साकारला. या विजयानंतर हैदराबाद संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान भुवनेश्वरला दुखापत झाली. यामुळे भुवीने पंजाबविरुद्धच्या सामन्यात ३ षटके गोलंदाजी केली. यात भुवीने १६ धावा देत के एल राहुलची मोठी विकेट घेतली. मात्र यानंतर भुवी मैदानाबाहेर गेला.
भुवी मैदानाबाहेर का गेला, याबाबत सर्व क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला. मात्र भुवीला दुखापत झाल्याची माहिती मूळची भारतीय असलेली आणि ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकर हिने दिली. भुवनेश्वरच्या मांडीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना त्रास होत आहे.