अबुधाबी -कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जाणाऱ्या इयान मॉर्गनला आज आयपीएलध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झुंजावे लागणार आहे. सततच्या खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिकने शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधारपद मॉर्गनकडे सोपवले. आजचा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.
कोलकाताने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. तर, तेवढ्याच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) नंतर ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने आठ सामन्यांत केवळ तीन सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीतून बाहेर पडल्याने गोलंदाजीबाबत हैदराबाद संभ्रमावस्थेत आहे. अव्वल फळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टो, कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांच्यावर संघाची भिस्त आहे. फिरकीपटू राशिद खानवर संघाच्या फिरकीची मदार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स -