नवी दिल्ली -आयपीएलच्या लीग टप्प्यातील सामन्यांच्या समाप्तीनंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे परतली आहे. रबाडाने मुंबईच्या जसप्रीत बुमराहकडून 'पर्पल कॅप' स्वत:कडे घेतली आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
सेहवागचा रवी शास्त्रींवर गंभीर आरोप, म्हणाला...
यंदाच्या हंगामात राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात राहुलने २९ धावा केल्या. राहुलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने मंगळवारी मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याच्या खात्यात १४ सामन्यांत ५२९ धावा आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १४ सामन्यात ५२५ धावा आहे.