महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सलामीचा सामना धोक्याचा; पाहा आकडेवारी

मुंबई इंडियन्सने यापूर्वी सहावेळा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला आहे. पण यात मुंबईला फक्त एकाच हंगामात स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले आहे.

ipl 2020 : mumbai indians played 6 time opening match in ipl history
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सलामीचा सामना धोक्याचा; पाहा आकडेवारी

By

Published : Sep 7, 2020, 5:43 PM IST

Updated : Sep 25, 2020, 6:00 PM IST

मुंबई - बहुचर्चित आयपीएल टी-२० स्पर्धेच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक रविवारी (ता.६) जाहीर करण्यात आले असून, येत्या १९ सप्टेंबर रोजी आयपीएलचा उद्घाटनपर सामना अबूधाबी येथे खेळवला जाणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ उपविजेता चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. मुंबई इंडियन्सने यापूर्वी सहावेळा आयपीएलमध्ये सलामीचा सामना खेळला आहे. पण यात मुंबईला फक्त एकाच हंगामात स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले आहे.

मुंबई इंडियन्सने यापूर्वी २००९मध्ये पहिल्यांदा आयपीएलचा सलामीचा सामना खेळला. या हंगामात मुंबईचा संघ गुणतालिकेत ७व्या स्थानी राहिला. त्यानंतर २०१२ आणि २०१४मध्ये सलामीचा सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २०१५मध्ये मात्र मुंबईने विजेतेपद पटकावले. २०१६ आणि २०१८ मध्ये मुंबईला पाचव्या स्थानापर्यंत मजल मारता आली.

दरम्यान, मुंबईचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने व्यक्तिगत कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. यामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे. फ्रेंचायझीने मलिंगाच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे. यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी कशी राहिल, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

आयपीएलचा १३वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. बीसीसीआयने साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा -'जर रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला, तर ठोकू शकतो द्विशतक'

हेही वाचा -दिल्लीचा धडाकेबाज खेळाडू म्हणतोय, कोरोना झाला तरी मी लढायला तयार...

Last Updated : Sep 25, 2020, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details