मुंबई - वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी मुंबईने चेन्नईचा विजय रथ रोखला. या सामन्यात त्यांनी महेंद्र सिंह धोनीच्या संघाला ३७ धावांनी धूळ चारली. खराब फटकेबाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण ही संघाच्या पराभवाची कारणे ठरली. या सामन्यात मराठमोळ्या शार्दुल ठाकूरच्या हातून क्षेत्ररक्षणात चूका झाल्या. त्यानंतर त्याने चक्क मैदानातच कर्णधार धोनीची हात जोडून माफी मागितली.
शार्दुलने भर सामन्यात हात जोडून मागितली धोनीची माफी
सामन्यात मराठमोळ्या शार्दुल ठाकूरच्या हातून क्षेत्ररक्षणात चूका झाल्या. त्यानंतर त्याने चक्क मैदानातच कर्णधार धोनीची हात जोडून माफी मागितली.
शार्दुल ठाकूर
जाडेजाच्या गोलंदाजीवर युवराजने स्टंपपासून दूर असलेला चेंडू टोलवला. तो चेंडू थेट पॉईंटवर असलेल्या शार्दूलकडे गेला. त्या चेंडूवर खरे पाहता एकही धाव होणे अपेक्षित नव्हते, पण शार्दुलने गचाळ क्षेत्ररक्षण केल्याने एक धाव काढण्यात युवराज यशस्वी झाला. हा प्रकार पाहिल्यानंतर धोनी शार्दूलवर नाराज झाल्याचे दिसून आले. शार्दुलला स्वत:ची चूक लक्षात आल्यानंतर त्याने धोनीची माफीही मागितली.