मुंबई - वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या १५ व्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ३७ धावांनी विजय मिळविला. मुंबई इंडियन्सने चेन्नईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. सूर्यकुमार यादव याच्या (५९) अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने २० षटकात ५ बाद १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकात ८ बाद १३३ धावा करता आल्या.
१७१ धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. अंबाती रायुडू शून्यावर माघारी परतला. शेन वॉटसनही स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे संघ चांगलाच दबावात आला. सुरेश रैना १६ तर केदार जाधव ५९ धावा काढल्या. या सामन्यात महेंद्र सिंहला फिनशरची भूमिका बजावता आली नाही. तो १२ धावांवर बाद झाला. रविंद्र जाडेजा १ धावांवर बाद झाला. केदार जाधवने ५८ धावा कुटल्या. पण तो संघास विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबईकडून हार्दिक पंड्या ३ , जेसन बेहर्नडार्फ २ तर लसिथ मलिंगाने ३ बळी घेतले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.