महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हैदराबादसाठी भुवनेश्वर कुमारने केले अनोखे 'शतक' - Sunrisers Hyderabad

आयपीएलमध्ये भुवनेश्वरने आजवर १०९ सामने खेळताना १२५ विकेट घेतल्या आहेत

भुवनेश्वर कुमार

By

Published : Apr 16, 2019, 8:12 PM IST

Updated : Apr 16, 2019, 8:26 PM IST

हैदराबाद - आयपीएलमध्ये १४ एप्रिलला खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने हैदराबादवर ३९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला असला तरी भुवनेश्वर कुमारने हैदराबादसाठी आयपीएलमध्ये अनोखे 'शतक' साजरे केले आहे.


दिल्लीविरूद्धच्या या सामन्यात भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना १०० विकेट गारद करण्याचा पराक्रम केला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करताच भुवीने हा विक्रम आपल्या नावावर केला. योगायोग म्हणजे, दिल्लीविरुद्ध खेळण्यात आलेला हा सामना हैदराबादचा १००वा सामना ठरला होता.


आयपीएलमध्ये भुवनेश्वरने आजवर १०९ सामने खेळले असून त्यात त्याने १२५ विकेट आपल्या नाववर केले आहेत. यापूर्वी तो बंगळुरू आणि पुण्याच्या संघासाठी खेळला आहे.

Last Updated : Apr 16, 2019, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details