नवी दिल्ली:आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाला ( Fifteenth season of IPL ) 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत यंदा दहा संघांचा समावेश आहे. तसेच दोन महिने चालणाऱ्या स्पर्धेत एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचा स्टेडियममध्ये जाऊन आनंद घेण्यासाठी चाहते खुप उत्साही आहेत. या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये एकून आसन क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना ( 25% crowd allowed ) उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शनिवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) 15 व्या हंगामासाठी स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल, असे आयोजकांनी बुधवारी सांगितले. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे.