हैदराबाद- पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी एक अशी बातमी पुढे आली की ज्यामुळे पाकिस्तानी जनता, क्रिकेट शोकिन यांना धक्का बसला आहे. न्यूझिलंडचा संघ तीन आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांच्या शृंखलेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार होता. मात्र न्यूझीलंडने रावलपिंडी येथे होणाऱ्या पहिल्या वनडेआधीच संपूर्ण दौरा रद्द केला.
दौरा रद्द करण्याचे कारण कोरोना विषाणू नाही तर पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत हा दौरा रद्द करण्यात आलाय. न्यूझीलंड सरकारने आपल्या क्रिकेट संघाला तात्काळ पाकिस्तानातून परतण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर संपूर्ण दौरा रद्द करावा लागला.
न्यूझीलंडच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही हैराण झाले आहेत. शोएब अख्तरने न्यूझीलंडवर पाकिस्तानी क्रिकेटला मारल्याचा आरोप केला आहे. शोएब अख्तरने ट्विट करून लिहिले, न्यूझीलंडने पाकिस्तानी क्रिकेटची हत्या केली आहे.