लंडन - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, ते पाकिस्तानातील स्थानिक परिस्थितीचा आढवा घेऊन पुढील 48 तासामध्ये दहशतावादाने ग्रस्त असलेल्या देशाचा दौरा करायचा की नाही यावर निर्णय घेतील.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी सुरक्षा संबंधी धमकी मिळाल्यानंतर पहिल्या वनडेपूर्वी पाकिस्तान दौऱ्यातून आपल्या संघाचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ दोन टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ऑक्टोबरमध्ये रावळपिंडीचा दौरा करणार आहे. 2005 नंतर त्यांचा हा पहिला पाकिस्तान दौरा असेल.
ईसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सुरक्षेच्या धोक्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याच्या निर्णयाची आम्हाला माहिती आहे. परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सुरक्षा पथकाशी आम्ही संपर्क साधत आहोत. ईसीबी बोर्ड पुढील 24 ते 48 तासांमध्ये आमचा दौरा वेळापत्रकानुसार होईल की नाही हे ठरवेल.''