नवी दिल्ली: भारतीय संघासाठी पुढील काही महिने खूप व्यस्त असणार आहेत. संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर ( IND Tour Of ZIM ) जाईल. हा सहा वर्षांतील त्यांचा पहिला दौरा असणार आहे. 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. केएल राहुल संघाचे नेतृत्व करू शकतो. ही मालिका आयसीसी पुरुष विश्वचषक सुपर लीगचा ( ICC Men's World Cup Super League ) भाग आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकासाठी 13 संघांची स्पर्धा थेट पात्रतेचा मुख्य स्त्रोत आहे.
झिम्बाब्वे सध्या 13 संघांपैकी 12 व्या क्रमांकावर ( Zimbabwe currently ranked 12th ) आहे. भारतीय संघाने शेवटचा झिम्बाब्वेचा दौरा 2016 मध्ये केला होता. जेव्हा संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले होते. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला यजमानांविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे.