हैदराबाद:लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) या नवीन संघाने इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) च्या हंगामात धमाकेदार प्रवेश केला होता. काही काळ हा संघ गुणतालिकेतही अव्वल स्थानावर देखील होता, पण आता हा संघ सामने गमावत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ शेवटच्या क्षणी सलग दोन सामने गमावून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरा नवा संघ गुजरात टायटन्सने अव्वल स्थानावर राहून आधीच 20 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहचून आपले स्थान बळकट केले आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals ) लखनौचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थानचे 16 गुण झाले असून चांगल्या नेट रनरेटमुळे तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या लखनौचेही १६ गुण आहेत. दोन्ही संघांचा आता आणखी १-१ सामना बाकी आहे. त्यानंतरच दोन्ही संघांचे स्थान निश्चित होईल. लखनौच्या संघाने शेवटचा उरलेला सामना गमावला तरी तो प्लेऑफसाठी पात्र ठरेल. वास्तविक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे तीन संघही प्लेऑफचे दार ठोठावत आहेत. आरसीबी सध्या 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर या संघाने शेवटचा सामना जिंकला, तर तो 16 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मजबूत दावेदार ठरेल.
तसेच, दिल्ली आणि पंजाबचे ( Punjab Kings ) आता 12 गुण आहेत आणि दोन्ही संघांना आता आणखी 2-2 सामने खेळायचे आहेत. यातील एक सामना एकमेकांविरुद्ध होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपले उर्वरित सामने जिंकता येणार नाहीत हे निश्चित. यापैकी एकच संघ आपले दोन्ही सामने जिंकू शकेल. अशा स्थितीत या दोन्ही संघांपैकी केवळ एकाच संघाला दोन्ही सामने जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. दिल्ली-पंजाब संघ सामना जिंकूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो, जर आरसीबीने त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी एक गमावला, तर त्याचबरोबर लखनौचा संघ शेवटचा सामना गमावूनही प्लेऑफमध्ये पोहोचेल.
त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ), चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांसारखे दिग्गज संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. हे सर्व आयपीएलचे महान संघ आहेत. मुंबईने पाच वेळा तर चेन्नईने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर कोलकाता आणि हैदराबाद 2-2 वेळा चॅम्पियन ठरले आहेत.