महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Indian Cricket Player Injured : भारतीय क्रिकेट संघातील मुख्य शिलेदार जखमी - Ravindra Jadeja Injured

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका ( India vs South Africa Test match) पार पडणार आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील मुख्य खेळाडू रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि शुबमन गिल दुखापतग्रस्त ( Indian Cricket Player Injured ) झाले आहेत. त्यांना पूर्णपणे फिट होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते मात्र याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे.

Indian Cricket Player Injured
भारतीय क्रिकेट संघातील मुख्य शिलेदार जखमी

By

Published : Dec 8, 2021, 5:42 PM IST

मुंबई - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका ( India v South Africa Test match) पार पडणार आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील मुख्य खेळाडू रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि शुबमन गिल दुखापतग्रस्त ( Indian Cricket Player Injured ) झाले आहेत. त्यांना पूर्णपणे फिट होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते मात्र याबाबत अद्याप बीसीसीआयनेकोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे.

शिलेदार जखमी -

कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचे डाव्या हाताचे बोटात इजा झाली होती. त्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. याच सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. स्कॅन केल्यानंतर त्याच्या हातावर सूज असल्याचे निदान झाले आहे. डॉक्टरांंनी त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात दिला आहे आणि त्यामुळे मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून त्यालाही बाहेर पडावे लागेल. कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य रहाणेच्या डाव्या हाताच्या दुखण्याला किरकोळ दुखापत झाली. तो पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. यासर्वांनावर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती जय शहा यांनी दिलेली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील ३ कसोटी सामन्यांत रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि शुबमन गिल हे खेळू शकतील की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे, याबाबत बीसीसीआयनेकोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत दौऱ्याचे वेळापत्रक

पहिली कसोटी - 26 ते 30 डिसेंबर , दुपारी 1.30 वाजल्यापासून, सेंच्युरियन.

दुसरी कसोटी - 3 ते 7 जानेवारी 2022, दुपारी 1.30 वाजल्यापासून, जोहान्सबर्ग

तिसरी कसोटी - 11 ते 15 जानेवारी 2022, दुपारी 2 वाजल्यापासून, केप टाऊन

ABOUT THE AUTHOR

...view details