जोहान्सबर्ग India vs South Africa 1st ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत के एल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं आधी 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली. ती मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली गेली होती. आज 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. शेवटी 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली जाणार आहे.
एकदिवसीय मालिकेत के एल राहूल करणार नेतृत्त्व : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवनं टी-20 मालिकेत भारताचं नेतृत्व केलं होतं. मात्र, एकदिवसीय मालिकेत के एल राहुलकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतील संघात समावेश केला नाही.
सामन्यात पावसाची शक्यता : स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यादरम्यान दिवस उष्ण असेल. परंतु, वादळासह पावसाची 40 टक्के शक्यता आहे. जोहान्सबर्गमध्ये शनिवारीही असंच वातावरण होतं. मात्र, या मैदानाची कोरडवाहू व्यवस्था बऱ्यापैकी आहे. त्यामुळं पाऊस पडला तरी सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. त्यामुळं आजच्या सामन्यात काही षटके कमी होण्याची शक्यता असली तरी सामन्याचा निकाल लागण्याची सर्व शक्यता आहे.
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड-टू-हेड : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या 91 एकदिवसीय सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेनं 50 सामने जिंकले आहेत. तर भारतानं 38 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांत निकाल लागू शकला नाही.
- भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान
- दक्षिण आफ्रिकेची संभावित प्लेइंग इलेव्हन : रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स
हेही वाचा :
- पांड्याचं 'हार्दिक' स्वागत करणं मुंबईला पडणार महागात? चाहत्यांसह संघातील अनेक खेळाडूही नाराज
- तिसरा टी20 सामना: भारतानं दक्षिण आफ्रिकेला चिरडलं; 106 धावांनी केला पराभव, सुर्याचं धडाकेबाज शतक