मुंबई - भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध ५ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या दौऱ्याला, मे महिन्याच्या अखेरीस रवाना होणार आहे. दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला लंडन सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे लंडन सरकारने भारताला लाल यादीत टाकले आहे. त्यामुळे नियमानुसार भारतातून येणाऱ्या लंडन किंवा आयर्लंड नागरिकांनाच लंडनमध्ये प्रवेश देण्यात येईल. पण लंडन सरकारने भारतीय संघासाठी क्वारंटाइन नियमांत आणि प्रवास बंदीचे काही नियम शिथिल केले आहेत.
दरम्यान, दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने सर्व खेळाडूंची घरोघरी जाऊन आरटी-पीसीआर चाचणी करायला सुरूवात केली आहे. तसेच बीसीसीआयने १९ मे रोजी सर्व खेळाडूंना मुंबईत हजर राहण्यास सांगितले आहे. या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांनाही घेऊन जाता येणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ -