कॅनबेरा -भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली. एकदिवसीय प्रकारात १२ हजार धावा ठोकणारा विराट वेगवान फलंदाज ठरला. मानुका ओव्हल मैदानावर विराटने ही जबरदस्त कामगिरी नोंदवली.
विराटचा वनडेत भीमपराक्रम, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे - virat kohli new runs record
विराटने १२ हजार धावांचा टप्पा २५१व्या एकदिवसीय सामन्यातील २४२व्या डावात खेळताना ओलांडला आहे. विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये हा टप्पा पार करणारा विराट भारताचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. तर एकूण सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने १२ हजार धावांचा टप्पा २५१व्या एकदिवसीय सामन्यातील २४२व्या डावात खेळताना ओलांडला आहे. विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ३०९ एकदिवसीय सामन्यांच्या ३०० डावांमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
विराट हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८०००, ९०००, १०००० आणि ११००० धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाराही क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराटने ७८ चेंडूत ५ चौकारांसह ६३ धावा केल्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान १२ हजार धावा पूर्ण करणारे क्रिकेटपटू -
- २४२ डाव - विराट कोहली.
- ३०० डाव - सचिन तेंडुलकर.
- ३१४ डाव - रिकी पाँटिंग.
- ३३६ डाव - कुमार संगकारा.
- ३७९ डाव - सनथ जयसुर्या.
- ३९९ डाव - माहेला जयवर्धने.