मुंबई- तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांनी एका मोबाईल कंपनीची जाहिरात केली होती. यानंतर, दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. तमन्ना भाटिया आणि विराट कोहलीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता यावर स्पष्टीकरण देताना तमन्नाने म्हटले आहे, की जाहिरातीच्या शुटींगनंतर आम्ही एकमेकांना कधीही भेटलो नाही.
विराटसोबतच्या डेटिंगसंदर्भात तमन्नाने केला मोठा खुलासा; जाणून घ्या, काय म्हणाली - डेटिंग
तमन्नाने म्हटले आहे, की जाहिरातीच्या शुटींगनंतर आम्ही एकमेकांना कधीही भेटलो नाही.
तमन्ना एका शोदरम्यान म्हणाली, माझ्या अंदाजानुसार विराट कोहलीने त्या जाहिरातीत फक्त ४ शब्द उच्चारले होते. यानंतर, विराटची आणि माझी कधीही भेट झाली नाही. परंतु, मी आतापर्यंत ज्या कलाकारांसोबत काम केले आहे, त्यापैकी विराट सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे. विराट कोहलीसोबत पहिल्यांदा काम करताना जरा अस्वस्थतेचा क्षण होता. परंतु, त्याने चांगले काम केले होते.
तमन्ना भाटिया हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात काम करते. तमन्नाने बाहुबली, पाईया आणि वीरम सारख्या चित्रपटात काम केले आहे. तमन्नाचे भारतात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत.