महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

AUS vs IND : उद्यापासून रंगणार टी-२० मालिका

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. दोन्ही संघ आता टी-ट्वेंटी मालिकेसाठी सज्ज झाले आहेत.

By

Published : Dec 3, 2020, 6:04 PM IST

India vs Australia
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

कॅनबेरा - तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २-१ असा पराभव केला. यानंतर उद्या (शुक्रवार)पासून तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत मागील पराभवाच्या वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. तर एकदिवसीय पाठोपाठ टी-ट्वेंटी मालिकाही आपल्या खिशात घालण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे.

भारतीय संघ

भारतीय संघ देईल जोरदार टक्कर -

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाच्या सर्व पडत्या बाजू यजमानांसमोर उघड झाल्या आहेत. मात्र, तरीही टी-ट्वेंटीमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. टी-ट्वेंटीसाठी भारताकडे एकदम संतुलित संघ आहे. वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहार आणि टी नटराजन यांच्या रूपात भारताकडे संतुलीत गोलंदाज आहेत. याशिवाय हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी या गोलंदाजांची फौज सज्ज आहे. ओव्हलचे पिच फिरकी गोलंदाजीसाठी चांगली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह सोबत गोलंदाची सुरुवात मोहम्मद शामी करेल की दीपक चहार हे पाहणे औत्सुकत्याचे आहे.

भारतीय संघ

ऑस्ट्रेलियाही आहे सज्ज -

एक दिवसीय सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. अ‌ॅरोन फिंचसोबत मार्नस लाबुशाने येतो की दुसरे कोणी याकडे सर्वांचे लक्ष आहे. मार्कस स्टॉईनिसदेखील डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र, तोही जखमी असल्याने त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन संघ

टी-ट्वेंटी पहिला सामना ठिकाण :ओव्हल, कॅनबेरा.

दिनांक आणि वेळ - डिसेंबर ४, दुपारी १ वाजून ४० मिनिटे

टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय चमू : विराट कोहली (कर्णधार), के एल राहुल (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गील, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दीक पंड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहार, टी नटराजन.

टी-ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन चमू : अ‌ॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अ‌ॅबॉट, अ‌ॅश्टोन एगर, अ‌ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरोन ग्रीन, जोश हेजलवूड, मॉइसेस हेनरिक्स, मार्नस लाबुशाने, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, अ‌ॅडम झाम्पा.

ABOUT THE AUTHOR

...view details