मेलबर्न - पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून धूळ चारली. या विजयानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे खूप कौतुक होत आहे. भारतातून नव्हे तर, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनीही रहाणेला शाबासकी दिली. याबाबत भारताचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा -AUS VS IND : पराभवावर टीम पेन म्हणाला, भारतीय संघाने आम्हाला...
गावसकर म्हणाले, "अजिंक्य संघाचे नेतृत्व करत असताना त्याचे ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांनी केलेले कौतुक आनंददायी होते. यात रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, माइक हसी, शेन वॉर्न अशा खेळाडूंचा समावेश होता.'' या विजयामुळे भारताने बॉर्डर-गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.