नवी दिल्ली India to Tour Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात त्यांना 6 सामने खेळायचे आहेत. यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. ही मालिका टी 20 विश्वचषक 2024 नंतर जुलैमध्ये खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या मालिकेची घोषणा केलीय.
कोणते संघ करणार श्रीलंकेचा दौरा : 2024 च्या भावी दौऱ्याचा कार्यक्रम श्रीलंकेनं जाहीर केलाय. यात भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेचाही समावेश आहे. झिम्बाब्वे संघ हा श्रीलंकेच्या भावी दौर्याच्या कार्यक्रमात पहिला संघ आहे. झिम्बाब्वेचा संघ जानेवारी 2024 मध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये बांगलादेशचा संघ श्रीलंकेत येईल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहेत. यानंतर 2024 टी-20 विश्वचषक जून आणि जुलैमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर जुलैमध्येच श्रीलंका संघ भारताविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यापुढं न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहेत. न्यूझीलंड दोन वेळा श्रीलंकेचा दौरा करणार आहे.