महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Australia tour of India : टी-20 विश्वचषकापूर्वी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार - ऑस्ट्रेलिया भारत दौरा

भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका ( Ind vs Aus three-match T20 series ) मायदेशात खेळणार आहे.

India
India

By

Published : May 10, 2022, 6:37 PM IST

मेलबर्न:सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाचा थरार सुरु आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारता विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. फॉक्स स्पोटर्स डॉट कॉम डॉट एयूच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार ( Australia tour of India ) आहे. भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका ( Ind vs Aus three-match T20 series ) खेळणार आहे.

ही मालिका ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषकाच्‍या तयारीसाठी ( Preparations for the T20 World Cup ) असेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाला फेब्रुवारी-मार्चमध्ये चार कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय संघाला 9 ते 19 जून दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.

भारतीय संघ 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे, जी कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आली होती. भारताला इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामनेही खेळायचे आहेत.

हेही वाचा -IPL 2022 MI vs KKR : विजयानंतर श्रेयसचा मोठा खुलासा, प्लेईंग इलेव्हन निवडण्यात 'या' व्यक्तीचा होता समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details