पॉचेफस्ट्रूम : ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरताना इंग्लंडचा संघ ६८ धावांत आटोपला.
भारतीय संघाची कामगिरी - भारताकडून तीतस साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी 2-2 बळी घेतले. तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 1 चेंडूत 14 षटकात 3 विकेट्स गमावून विजय मिळवला. भारताकडून सौम्या तिवारी आणि त्रिशा यांनी 24-24 धावा केल्या. शेफालीने 15 तर श्वेताने 5 धावा केल्या.
विश्वचषकावर भारताने कोरले नाव - कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिला १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या तयारीने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
५ कोटी रुपयांचे बक्षीस - बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे.